ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

भिवंडी -वसई रोडवरील मालोडी टोलनाका वसुली मनसे कार्यकर्त्यानी केला बंद

भिवंडी दि 19 तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिक नागरीकांच्या सर्वपक्षीय गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या साठी आंदोलन केली जात असताना स्थानिकांच्या रास्तारोको आंदोलना च्या एक दिवस आधी या रस्त्याची पाहणी मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी करून टोल वसुली बंद करण्याचा इशारा दिला होता .त्यानुसार स्थानिकांचे रास्तारोको आंदोलन होताच दुसऱ्याच दिवशी अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालोडी टोल नाका येथे धडक देत येथील टोल वसुली बंद करून रस्त्यावरील वाहनांना टोल न भारताचा जाऊ दिले .परंतु स्थानिकांच्या आंदोलच्या पार्श्वभूमीवर मनसेने वेगळे आंदोलन केल्याने हा सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे .यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी,ठाणे जिल्हा  उपाध्यक्ष संजय पाटील सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..

error: Content is protected !!