ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघां मध्ये मतदान


मुंबई/उद्या महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या निवडणूक होणार आहे या मतदानानंतर महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण होईल आणि चार जून रोजी निकाल लागेल
उद्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात नाशिक दिंडोरी धुळे ठाणे कल्याण ,भिवंडी, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पूर्व मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई अशा 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे या 13 मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाची कसोटी लागणार आहे

खास करून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये तीव्र सुरस बघायला मिळणार आहे या निवडणुकीत विद्यमान खासदार अरविंद सावंत, यामिनी जाधव, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे ,श्रीकांत शिंदे आधी खासदारांचे भवितव्य पणाला लागणार आहे तर सर्वाधिक चुरस नाशिक मध्ये बघायला मिळणार आहे नाशिक मध्ये तिकीट वाटपावली मोठे मतभेद झाले होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठे वाद झाले होते पण अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना मिळाली मात्र नाशिक मधून निवडून येताना हेमंत गोडसे यांचे मोठी कसोटी आहे कारण या ठिकाणी ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबरच शांतिगिरी महाराज मैदानात आहे त्यामुळे हिंदुत्वाची बरीचशी मते शांतिगिरी महाराजांना केली तर महायुतीच्या हेमंत गोडसेंना पराभवाला सामोरे जावे लागेल तोच प्रकार ठाणे आणि कल्याण मध्ये आहे ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीतील पक्षांमध्येच तीव्र मतभेद आहेत कल्याण मध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्ला केला होता गणपत गायकवाड यांनी तर शिंदे गटाच्या शहर प्रमुख आला पोलीस ठाण्यात जाऊन गोळ्या घातल्या होत्या गणपत गायकवाड सध्या अटकेत आहेत त्यामुळे गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते श्रीकांत शिंदेंचे काम करणार नाही त्यामुळे श्रीकांत शिंदे अडचणीत आहे ठाण्यातही तीच परिस्थिती आहे या ठिकाणी गणेश नाईकांचे चिरंजीव संजीव नाईक ही इच्छुक होते पण त्याला डावलून नरेश मस्केना तिकीट देण्यात आली त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यात राडेबाजी झाली आताही गणेश नाईकांचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या उमेदवाराचे मनापासून काम करतील याची कोणतीही गॅरेंटी नाही त्यामुळे नरेश म्हस्के यांची उमेदवारी धोक्यात आहे .पालघर मध्ये तिरंगी लढत आहे राजेश पाटील भव्य याच्या भारती कांबळी आणि महायुतीचे डॉक्टर हेमंत सावरा अशी लढत आहे पण या ठिकाणी हेमंत सावरा यांची बाजू अत्यंत कमकुवत आहे कारण या मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद आहे त्यामुळे भाजपा समोर अनेक अडचणी नाहीत या उलट बविया आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची चांगली दमछाक होणार आहे त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भव्या यांच्यातच लढत होईल

मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुंबईच्या सहापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपा तर तीन मतदारसंघांमध्ये शिंदे गट निवडणूक लढवीत आहेत मात्र भाजपाची उत्तर मुंबईची पियुष गोयल आणि उत्तर पूर्वजी मिरू मिहीर पोटाच्या यांच्या दोन जागा सोडल्या तर महायुतीला उर्वरित चार जागांमध्ये काटेरी लढत होण्याची शक्यता आहे उत्तर मुंबईत तसेच उत्तर पूर्व मुंबई गुजराती मारवाडी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हेच गुजराती मारवाडी भाजपच्या उमेदवारांना तारू शकतील

या उलट दक्षिण मुंबई शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांची स्थिती चांगली आहे . भाजपा कार्यकर्ते यामिनी जाधवचा मनापासून प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे तसे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत तर उत्तर मध्य मुंबईत स्थानिक खासदार प्रमोद महाजन यांच्या कन्या पुनम महाजन याना डावळून

एडवोकेट उज्वल निकम याला तिकीट दिल्याने . ही जागा भाजपासाठी गेम चेंजर् ठरू शकते . उत्तर पश्चिम मुंबईत दोन शिवसेना आमदार आहेत उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर त्यामुळे या दोन शिवसेना आमदारांपैकी मतदार कोणाला निवडून देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!