ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मी संविधानाचा रक्षक आहे कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही- मोदी


मुंबई/मी पुन्हा स्तेवर आलो तर सविधान बदलेन अशा विरोधकांकडे अफवा पसरवल्या जात आहे परंतु कुणाचा बाप आला तरी त्याला संविधान बदलता येणार नाही. कारण मी संविधानाचा रक्षक आहे असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना सांगितले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तसेच शरद पवारांवर ही कडाडून हल्ला केला
आज शिवाजी पार्कच्या सभेत राज ठाकरे आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते .राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या मोडींकडू काय अपेक्षा आहेत याची सविस्तर माहिती दिली. आणि या अपेक्षा मोदींनी पूर्ण कराव्या अशी मागणी केली दरम्यान मोदींनी आपल्या भाषणात त्यांच्या काळात झालेल्या सर्व विधायक कामाचा आढावा घेतला ते म्हणाले गेले अनेक वर्ष इथे ज्या लोकांनी राज्य केले त्या लोकांना जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणे असाभव वाटत होते त्याचबरोबर तिहेरी तलाक बंद करणे अशक्य वाटत होते पण माझ्या सरकारने त्यांना जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले केल्या दहा वर्षात जे आम्ही केले ते काँग्रेस ल 65 वर्षातकरता आलेले नाही .काँग्रेस फक्त गरिबी हटाव बद्दल घोषणा करायच्या. पण आम्ही प्रत्यक्षात 25 कोटी गरिबांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले. वास्तविक महात्मा गांधींची मागणी त्यावेळेस मान्य करायला हवी होती. महात्मा गांधी म्हणाली होते की काँग्रेसला बरखास्त करून टाका. जर काँग्रेस बरखास्त झाली असती तर देश पाच दशके मागे गेला नसता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर हल्ला करताना आज कल नकली शिवसेनेचे लोक काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत जे काँग्रेसवाले सावरकरांना उठता बसता शिव्या देतात त्यांच्याबरोबर त्यांचा घरोबा आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना हा सगळा प्रकार बघून खूप दुःख झाले असते असेही मोदींनी सांगितले

error: Content is protected !!