ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबईकर मतदारांच्या जबाबदारीची कसोटी.

मुंबई-( किसनराव जाधव ) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, यातील मुंबईच्या सहा जागांवरील मतदान खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. याचे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि देशाच्या एकूण महसुलापैकी ४०% महसूल एकट्या मुंबईतून केंद्राला जातो. परंतु त्या बदल्यात मुंबईला काय मिळते? हा खरोखरच संशोधनाचा आणि प्रत्येक मुंबईकर जनतेला विचार करायला लावणारा प्रश्न आहे .म्हणूनच मुंबईकरांनी अत्यंत जबाबदारी आणि विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे. लोकसभेच्या आजच्या मतदानात भावनिक न होता, मुंबईचे कोणाकडून भले होऊ शकते, मुंबईचे मराठी पण कोणाकडून टिकून राहू शकते, मुंबईचे वैभव आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व कोणामुळे टिकून राहू शकते, आणि मुख्य म्हणजे मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व कोण टिकू शकेल यावर मतदान करण्याची गरज आहे. मुंबईतील सर्वात मोठा प्रश्न वाढत्या लोकसंख्येचा आहे.या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या नागरी सुविधांवर परिणाम होत आहे. मुंबईत रोजच्या रोज देशभरातून परप्रांतीयांचे लोंढे येत असतात. या लोंढ्यांमुळे मुंबईत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आजवरचा राजकीय इतिहास पाहता कुठल्याही पक्षाने हे लोंढे कसे रोखता येतील? यावर गांभीर्याने विचार केलेल्या नाही. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आणि या  वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत निर्माण झालेल्या विविध समस्यांना, इथले सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे मुंबईकर जनता कमालीची नाराज झालेली आहे. मुंबईतील मराठी माणूस हा मुंबईची शान होता. परंतु परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे खास करून व्यवसाय ,बिल्डर आणि फेरीवाला यांच्या मुंबईतील अतिक्रमानामुळे मुंबईकर मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला . आज मुंबईमध्ये फक्त 33 टक्के मराठी माणूस शिल्लक आहे. आणि तोही मुंबई बाहेर फेकला जाण्याच्या स्थितीत आहे .त्यामुळे रक्त आणि घाम गाळून मिळवलेली ही मुंबई पूर्णपणे परप्रांतीयांच्या हाती देणार का? हा प्रश्न सुद्धा मुंबईकरानी स्वतःला विचारून पाहणे गरजेचे आहे.
         मुंबईच्या सहा मतदार संघाचा विचार करता, दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यात सरळ लढत आहे. अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. परंतु दक्षिण मुंबईच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आलेले आहे. दक्षिण मुंबईत एकीकडे मलबार हिल मधील उच्चभ्रू लोकवस्ती तर दुसरीकडे गिरगाव, भेंडी बजार बोरीबंदर नागपाडा भायखळा, वरळी अर्थ रोड सारखी मध्यम वर्गीय वस्त्या त्यामुळे इथे अनेक समस्या आहेत. 

दक्षिण मुंबईत प्रामुख्याने मोठी समस्या आहे ती वाहतूक कोंडीची! कारण मुंबईच्या मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहे तर मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे रस्ते जाम झालेले आहेत .त्यामुळे वाहतूक कोंडी हा दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मेट्रोच्या कामाचे सोडा आज ना उद्या ते पूर्ण होईल. परंतु फेरीवाल्यांनी जे रस्ते अडवलेले आहेत त्याचे काय? फुटपाथ आणि फुटपाथ सोडून रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांबाबत कुठल्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची 25 वर्ष सत्ता होती. परंतु फेरीवाल्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. दक्षिण मुंबईतील अनेक भागात परप्रांतीय फेरीवाल्यांनी फुटपाथ सोडून रस्ते अडवलेले आहेत. खास करून भेंडी बाजार, नळ बाजार , क्रॉफर्ड मार्केट , मुंबई सेंटर, ग्रँड रोड, भायखळा,सीएसटी, कुलाबा हा सगळा जो परिसर आहे तो जणू काही फेरीवाल्यांच्या ताब्यात आहे. फेरीवाल्यांनी फुटपाथवर धंदे लावलेत हे  एकवेळ समजू शकते. परंतु ज्या लोकांनी रस्त्यावर  बाजार मांडलाय ?  त्यांच्याबद्दल इथल्या खासदारांनी, आमदारांनी, किंवा नगरसेवकांनी महापालिकेकडे कारवाईबाबत कधी पाठपुरावा केला आहे का? तर अजिबात नाही !त्यामुळे फेरीवाले आणि त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्न आजही अधांतरी लटकतोय.
       दक्षिण मुंबईतील दुसरा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोडकळीस आलेल्या चाळींचा. दक्षिण मुंबईत शेकडो मोडकळीस आलेल्या चाळी आहेत .आणि त्यात लोक अक्षरशा जीव मुठीत धरून राहतात. दक्षिण मुंबईत पावसाळ्यात मोडकळीस आलेल्या काही चाळी कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आणि त्यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. परंतु या मोडकळीस आलेल्या चाळी आणि त्यातील रहिवाशांच्या सुरक्षे  बद्दल इथल्या लोकप्रतिनिधी कधीही सकारात्मक भूमिका घेतल्याचे आठवत नाही. मोडकळीस आलेल्या चाळीना महापालिकेकडून नोटीस  नोटीस दिल्या जातात. पण मोडकळीस आलेल्या चाळीतील रहिवाशांनी कोणाच्या भरोशावर आपल्या खोल्या खाली करून बिल्डरला द्यायच्या? उद्या जर त्यांची जागा बिल्डरने हडप केली तर त्याला जबाबदार कोण? आणि याच भीतीपोटी लोक आपली घरे खाली करायला तयार नाहीत .मोडकळीस आलेल्या चाळीतच जीव मुठीत धरून राहतात. या प्रश्नाकडे इथले विद्यमान खासदार यांनी कधी सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे का? किंवा त्यांच्या पूर्वीचे खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली दौरा यांनीही कधी मोडकळीस आलेल्या चाळींचा प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतली नव्हती. दक्षिण मुंबईतील प्रत्येक मतदाराने आज याच गोष्टीचा विचार करून कोणाला मत द्यायचे याचा निर्णय घ्यायचा आहे.        

     दक्षिण मध्य आणि उत्तर  मध्य या दोन्ही मतदारसंघांमध्ये समस्यांचा डोंगर आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. परप्रांतीय  झोपडपट्टी वासियांनी अनेक बोगस कागदपत्र आधारे घरे लाटली याला बाहेरून आलेल्या लोकप्रतिनिधी व येथील दलाल लोकांनी चिरीमिरी घेऊन नागरिकांशी गद्दारी केली तरी तरी कार्यरत लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवण्याचे काम केले नाही परिणाम परप्रांतीय नेतृत्व त्यांची जागा बाळकावून शिर जोरपणा चालू ठेवला आहे याला आवर शिवसेनेला घालता आला नाही .
सोबत मोडकळीस इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत सरकारचे जे धोरण आहे ते अत्यंत कच खाऊ धोरण आहे. सरकारकडून पुनर्विकासाबाबत लोकांना हमी हवी आहे. कारण आजवरचा पुनर्विकासाचा इतिहास पाहता, लोकांची  बिल्डरांनी घरे ताब्यात घ्यायची आणि त्यांना ट्रांजिस्टर मध्ये ढकलायचे .व पंधरा पंधरा वीस वीस वर्षे लोकांना ट्रांजिस्ट कॅम्प मध्ये लटकवून ठेवायचे. असे प्रकार मुंबईत आणि खास करून दक्षिण मध्य व उत्तर मध्य मुंबईमध्ये घडत होते .त्याचबरोबर पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांची घरे खाली करून घ्यायची आणि त्यानंतर लोकांना बिल्डरांनी भाड्यासाठी रखडवायचे असेही प्रकार दक्षिण आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये घडलेले आहेत. या ज्वलंत प्रश्नाबाबत या दोन्ही मतदारसंघातील खासदारणी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. .असे प्रकार जर घडायला लागले तर लोकांनी मतदान का करावे ?उत्तर मध्य मुंबईत धारावीसारखी आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी येते .आता या झोपडपट्टीचा विकास गौतम अदानी करणार आहेत.अदानी बद्दल लोकांच्या मनात पहिल्यापासून संशय होता. त्यामुळे धारावी मधील झोपडपट्टीतल्या लोकांना पुनर्विकासाच्या नावाखाली बाहेर काढायचे, आणि त्यांना तिथून हाकलून द्यायचे अशी तर भूमिका अदानी घेणार नाही ना? असा आता  तिथल्या लोकांना संशय यायला लागलाय. त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.  ईशान्य मुंबई या भागातही प्रामुख्याने झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे.  या भागात रमाबाई आंबेडकर नगर सारखी मोठी झोपडपट्टी येते .त्याचबरोबर घाटकोपरच्या असल्फा विलेज पासून ते विक्रोळीच्या डोंगरापर्यंत मोठ्या प्रमाणावर डोंगरात झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत. पावसाळ्यात या भागातील दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे इथले झोपडपट्टी वासिय नेहमीच मृत्यूच्या छायेखाली वावरत असतात.  म्हणूनच तिथल्या लोकांनी विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे.
           उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई हे दोन्ही मतदारसंघ उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय लोकांचे आहे.त या ठिकाणी बऱ्यापैकी नागरी सुविधाची कामे झालेली  आहेत .परंतु तेवढी पुरेशी नाहीत .या भागामध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई मध्ये ज्या काही प्रलंबित समस्या आहेत त्या का सोडवल्या गेल्या नाहीत? याबाबतचा जाब विचारणे गरजेचे आहे .उत्तर पश्चिम मध्ये सुनील दत्त व त्यांची कन्या प्रिया दत्त यांनी बऱ्यापैकी कामे केलेली आहेत .तर उत्तर मुंबई मध्ये गोपाळ शेट्टी यांचेही चांगली काम आहेत .परंतु उत्तर मुंबईमध्ये येणाऱ्या पुनर्विकास अजूनही हवा तितका विकास झालेला नाही. त्यामुळे त्या  पुनर्वसन ही गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात येतात मुंबईच्या सहाही मतदारसंघातील लोकांनी आज विचारपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे.             

      त्याचबरोबर ठाणे कल्याण भिवंडी या मुंबई लगतच्या शहरांमध्येही आज मतदान होत आहे. ठाणे आणि कल्याण मध्ये भावनिक मतदानाचे आवाहन केले जात आहे .परंतु या ठिकाणी इथल्या मतदारांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे लोकांनी भावनिक आव्हान करणाऱ्यांना बाजूला सारून जो लोकांची काम करणारा,लोकांना मदत करणारा उमेदवार असेल त्यालाच मतदान करावे. म्हणूनच आजचा मतदानाचा पाचवा टप्पा या मतदार संघातील खूपच महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणारा आहे. त्यामुळे लोकांनी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे

error: Content is protected !!