ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट


लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात उतरणार आहेत
स्वामी प्रसाद मौर्य हे युपी मधील बाहुबली नेते म्हणून ओळखले जातात पूर्वी ते मायावतींच्या बसपा मध्ये होते तेथून गेले आणि उद्रंन विधानसभा मतदार संघातून निवडून आले.त्यानंतर त्यांना योगी मंत्रिमंडळात कामगार आणि नियोजन खात्याचे मंत्रिपद मिळाले मात्र त्यांचे मन रमले नाही आणि येणं निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देवून पक्षही सोडला त्यांच्या सोबत दोन आमदारांनीही भाजपा सोडली आहे दरम्यान पक्ष सोडल्यानंतर आता ते समाजवादी लक्षात जाणार असून त्यांनी मंगळवारी अखिलेश यादव यांची भेट घेतली केवळ मौर्यच नव्हे तर योगी मंत्रिमंडळातील आणखी पाच मंत्री आणि काही आमदार भाजपा सोडणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.तर भाजपने मात्र मौर्य यांच्या जाण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही असे म्हटले आहे.दुसरीकडे शरद पवार यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून लवकरच दोन्ही पक्षांची लखनौ मध्ये जागा वातपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे.

error: Content is protected !!