ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही

मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.
एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या मागणी बाबत काहीही करू शकत नाही परिवहनमंत्री अनिल परब यांनी अनेक वेळा हे स्पष्ट केले आहे. पण भाजपचे काही नेते मात्र एस टी कामगारांना भडकवत असल्याचा आरोप परिवहन मंत्री करीत आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका खूपच महत्वाची आणि निर्णायक ठरणार होती .त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे एस टी कामगारांचे लक्ष होते त्यानुसार काल शरद पवारांनी सांगून टाकले की राज्यात अनेक महामंडळे आहेत अशावेळी एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांची विलीनीकरण करण्याची मागणी मान्य केली तर इतर महामंडळा चे कर्मचारी नाराज होतील .अशावेळी सर्वच महमंडलांच्या कर्मचाऱ्यांना दुखवण शक्य होणार नाही.याचाच अर्थ सरकार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करू शकत नाही .मात्र तरीही रोजच्या रोज बैठका सुरू आहेत पण त्यांचा आता काहीच उपयोग होणार नाही. उलट एस टी महामंडळाने सेवा समाप्तीच्या नोटीस देण्यास सुरुवात केल्याने संपकरी हवालदिल झाले आहेत तर आतापर्यंत २५०० हून अधिक संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!