ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर

मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मृत्यू पावलेल्या 254 पैकी 122 प्रकरणे मंजूर झाली आहेत आणि या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या वारसांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहेत 63 प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे.तर वारसा वादामुळे 14 मृत व्यक्तींच्या वारसांना नोकरी देण्याबाबत अडचणी आहेत तर 8 वारस नसल्याने निर्णय राखून ठेवण्यात आले .31 डिसेंबर 2021 रोजी नंतर तिसरे अपत्य असल्यास वारसा हक्काचा दावा नामंजूर होतो म्हणूनच या 17 प्रकरणांमध्ये आता काही होईल असे दिसत नाही .

error: Content is protected !!