ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन . अडवल्यात कचऱ्याच्या गाड्या .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ५ येथे असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी गेल्या चार वर्षा पासुन स्थानिक नागरिका सह राजकिय पक्ष हे आंदोलन करत आहेत . मात्र ते डंपिंग ग्राऊंड हटवन्यात महापालिकेला अद्याप ही यश आले नाही . तेव्हा हे डंपिंग ग्राऊंड कायम स्वरुपी हटवन्यात यावे या मागणी साठी शिवसेने आज आंदोलन करुन त्या डंपिंग ग्राऊंड वर कचरा टाकण्या करिता येणाऱ्या गाड्या अडवुन त्या परतवुन लावल्या आहेत .

उल्हासनगर कॅंप ५ येथे उल्हासनगर महापालिकेने अनधिकृत रित्या डंपिंग ग्राऊंड सुरु केले आहे . या डंपिंग मुळे स्थानिक नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न पुढे आला आहे . हे डंपिंग ग्राऊंड हटवन्यात यावे या साठी स्थानिक नागरिकाना आणि शहरातील राजकिय पक्षानी आंदोलन केलीत . परंतु ते डंपिंग आता पर्यंत हटवन्यात आले नाही . या डंपिंग वर रोज कोणती ही प्रक्रिया न करता ३६० टन कचरा टाकन्यात येतो . त्यामुळे या डंपिंग वर ८ मजल्या इतके कचऱ्याचे ढिग लागले आहेत . तर या डंपिंग ची कचरा साठवन्याची क्षमता सुध्दा संपलेली आहे . त्यामुळे आता कचरा हा कैलास कॉलनी ते गायकवाड पाडा या रोडवर टाकन्यात येतो . त्यामुळेच डंपिंग ग्राऊंड हटवन्यात यावे म्हणुन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वा खाली डंपिंग हटाव आंदोलन करण्यात आले आहे . या आंदोलनात महापौर लिलाबाई आशान . कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे . उपजिल्हा प्रमुख चंदकांत बोडारे . आमदार डॉ . बालाजी किणीकर .नगरसेवक अरुण आशान सह शेकडो शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते . लवकरच हे डंपिंग उसाटणे येथे हलवण्यात येणार असे लेखी आश्वासन आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी दिल्यावर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे .

error: Content is protected !!