ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द


दिल्ली/ विधानसभेत गैरवर्तन केल्या प्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जे भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते .त्या १२ आमदारांचे काल सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले आहे .महाराष्ट्र सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे
गेल्या वर्षी जुलै मध्ये पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालून अध्यक्षांना शिवीगाळ केल्या प्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या आशिष शेलार.अतुल भातखळकर,गिरीश महाजन,जयकुमार रावल,योगेश सागर ,बंटी भांगडीया,नारायण कुचे,हरीश पिंपळे,राम सातपुते संजय कुटे,अभिमन्यू पवार आणि पराग आळवणी या १२आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केले होते. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती मागील दोन अधिवेशनात या आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासाठी भाजप कडून प्रयत्न केले गेले पण निलंबन रद्द झाले आखेर भाजपने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तिथे सुनावणी होऊन न्यायालयाने सरकार आणि विरोधक दोन्ही बाजू ऐकून घेतल्या मात्र बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या आमदारांना फार तर एका अधिवेशन पुरते निलंबित करता येऊ शकते. वर्षभर निलंबन चुकीचे आहे असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने त्या १२ आमदारांचे निलंबन करण्याचा विधानसभा अध्यक्षांनी अधिकाराचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि १२आमदारांचे निलंबन रद्द केले त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात y १२आमदारांना उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
लीड

error: Content is protected !!