ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांचा सत्कार.

उल्हासनगर / प्रतिनिधी : स्वतंत्र दिनानिमित्त संपूर्ण भारतातून २५ अग्निशमन दल अधिकारी याना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले असुन त्यापैकी महाराष्ट्राला ८ शौर्य पदक प्राप्त झाले आहे . व त्या ८ शौर्य पदका पैकी उल्हासनगर महानगरपालिकेच्या ४ अग्निशमन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहेत.
तेव्हा आपल्या साठी आणि उल्हासनगर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे चीफ ऑफिसर बाळू नेटके, डेप्युटी चीफ ऑफिसर पंकज पवार, स्टेशन अग्निशमन ऑफिसर संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचे सर्वच स्थरातुन अभिनंदन होत आहे .

प्रभाग क्र १२ च्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यानी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात चारही शौर्य पदक प्राप्त अग्निशमन अधिकाऱ्यांचा ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक महादेव सोनवणे , समाजसेवक शिवाजी रगडे, सेनेचे उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी, व्यापारी मंडळ अध्यक्ष दुर्गेश पांडे, राजाराम जावळे, विजय उबाळे, राहुल निकम,मंगेश घोडेस्वार, प्रवीण घनबहादूर, अनिल रौराळे,अरुण शर्मा,राजेश वाघ, रूपेश ढोके, सिद्ध सोनवणे, शंकर सोनवणे यांच्या उपस्थितीत सत्कार करून त्याना शाल व तुळशीची रोपे देवुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे .

error: Content is protected !!