ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लसीकरण झाल्या शिवाय दारू मिळणार नाही -उत्पादन शुल्क विभागाच्या फत्व्याने पिनाऱ्यांचे वांदे


खांडवा/करोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली मोहीम जास्तीत जास्त यशस्वी व्हावी यासाठी सरकारी अधिकारी नवी नवी शक्कल लढवत आहेत
मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने फतवा जारी केला आहे की दारूच्या कुठल्याही दुकानावर किंवा बार मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकांनाच दारूची विक्री करावी अन्यथा दारूच्या दुकानाचा परवाना एक महिन्यासाठी स्थगित केला जाईल.उत्पादन शुल्क विभागाच्या या फत्व्या मुळे आता देशी किंवा विदेशी दारूच्या दुकानावर तसेच हातभट्टीची अड्ड्यावर लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवल्या शिवाय दारू मिळत नाही त्यामुळे पिणाऱ्यांचे वांदे झाले असून आता त्यांनी लसीकरणाच्या रांगेत लस घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!