ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सध्या वेट अँड वोच! मराठ्यांना जरागेचा सबुरीचा सल्ला


मुंबई/मराठ्यांनी आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आलात आपली ही ताकद अशीच कायम राहू द्या! आपल्याला राज्यात कोणत्याही प्रकारची शांतता बिघडवायची नाही. म्हणूनच सात आठ दिवस पण गप्प राहूया. हे लोक काय करतात तेच आम्हाला बघायचं आहे. मात्र मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. असे आज जरा घे पाटील यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांना संबोधित करताना ते म्हणाले, आपलं आंदोलन अत्यंत शांतपणे सुरू आहे. आणि यापुढे सुद्धा ते तसंच शांतपणे चालू राहू द्या. सरकारला आज ना उद्या आपल्याला आरक्षण द्यावेच लागेल. मराठ्यांची ताकद त्याने अजून ओळखलेली नाही. ते आपल्याला दाबू शकत नाहीत .आज आरक्षणाच्या निमित्ताने सर्व मराठा समाज एकत्र आलेल्या आहे .निवडणुका तोंडावर आहेत अशा स्थितीत मराठ्यांना दाबण्याचा सरकार प्रयत्न करू शकत नाही. मराठा लढवय्या आहे .त्यामुळे तो आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही .पण माझी सर्व मराठ्यांना विनंती आहे की काही झालं तरी आपण आपला आंदोलन शांततेने सुरू ठेवायचं . कुठल्याही प्रकारची शांतता बिघडवू द्यायची नाही. आपलं आंदोलन हे यशस्वी झालेल्या आहे. आणि सरकारला आपल्याला आरक्षण द्यावेच लागेल .असे आज जरांगे पाटील यांनी सांगितलं .त्याचबरोबर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण सुरूच ठेवायचे असे त्यांनी सांगितलेले आहे.

error: Content is protected !!