ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

बी डी डी चाळ पुनर्वसन प्रकल्पामुळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी–नायगाव, वडाळा, दादर भागातील भाजपचा जनाधार वाढविण्यात आमदार आपयशी ?

उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही.

मुंबई/ फडणवीस,दरेकर यांच्या सारख्या हुशार,अभ्यासू आणि लोकप्रिय नेत्यांचे मार्गदर्शन मिळूनही दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांना त्यांच्या मतदार संघात भाजपचा जनाधार वाढवता आलेला नाही त्यामुळे भाजपा नेतृत्व अशा लोकांवर नाराज आहे.दादर,नायगाव,शिवडी, वडाळा,हा गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र हा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून हिसकावून घेण्यासाठी भाजपने प्रयत्न तर केले पण इथले स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी आवश्यक ते प्रयत्न कमी पडलेत .मला कुठल्या पक्षाच्या बेनरची गरज नाही मी माझ्या नावावर निवडून येतो असा आमदारचा यांचा समज असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे .कदाचित त्यांच्या याच समजुतीमुळे त्यांनी भाजपा पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपने आणि मोदी सरकारने केलेल्या कामाचा विभागात प्रचार आणि प्रसार केला नसावा.म्हणूनच बी डी डी चाळीच्या पुनर्वसनाचे सर्व श्रेय महाविकास आघाडीच्या पदरी पडले .महाविकास आघाडीतील शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बी डी डी चाळ पुनर्वसनाचे सर्व श्रेय आपल्या सरकारला मिळावे यासाठी या प्रकल्पाचा जोरदार प्रचार आणि प्रसार केला.या उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही.
आज केंद्र सरकारने ज्या काही चांगल्या योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा प्र्चार आणि प्रसार करण्याचे काम भाजपचे जुने कार्यकर्ते करीत आहेत कारण ते आपल्या पक्षाशी प्रामाणिक आहेत. त्यांचे समाजातील सर्व स्तरातील लोकांशी चांगले संबंध आहेत विशेष म्हणजे प्रसार माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांशी त्यांचे सलोख्याचे आणि मित्र् त्वाचे संबंध आहेत.त्यामुळेच विधानसभा सन २०१४ निवडणुकीत भाजप उमेदवाराला प्रचंडअशी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक कोळंबकर कसेबसे जेमतेम ७०० मतांनी निवडून आले.यात पत्रकारांची मोठी भूमिका होती खुद्द फडणवीस दरेकर चंद्रकांत दादा यांच्या सारखे नेते पत्रकार मंडळींशी सलोख्याचे संबंध ठेऊन आहेत . पक्षाची सरकारची धेय धोरणे लोकांपर्यंत पसरवण्याचे काम प्रसारमाध्यमेच करीत असतात .

याच बरोबर हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी या भागात एखादे सक्षम आणि स्वतः पेक्षा पक्षाचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.तरच या भागात भाजपचा जनाधार वाढू शकेल.कार्यकर्त्याच्या गराड्यात रमणाऱ्यांना भाजपची राष्ट्रभक्ती आणि देशेसेवेला समर्पित असलेली प्रामाणिक तळमळ समजणार कसे ?

error: Content is protected !!