ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

सूनहरा बचपन अंतर्गत २३०० विद्यार्थ्यांना दिली शिक्षणाची संधी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे संयुक्त उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी); सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने दोन वर्षांच्या यशस्वी भागीदारीद्वारे अनेक सामाजिक कारणांसाठी भागीदारी केली आहे. सुनेहरा बचपन या उपक्रमांतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त पुढाकाराने, प्रख्यात एनजीओ- चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय) द्वारे वंचित मुलांसाठी एक वर्षाचे शिक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट होते. डिसेंबर २०१२ मध्ये सुनेहरा बचपनच्या पहिल्या आवृत्तीत २३०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रायोजित केल्यानंतर, सध्याच्या मोहिमेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फील्ड फंक्शन्स आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सच्या प्रयत्नांद्वारे २५५५ विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळाली. व्हर्च्युअल चेक हस्तांतरण समारंभात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापन कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एमव्ही राव, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक आलोक श्रीवास्तव, राजीव पुरी आणि विवेक वाह, वरिष्ठ व्यवस्थापन टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स चे नवीन ताहिल्यानी, वेंकटचलम एच, सीआरवाय इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री पूजा मारवाहा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सर सोरबाजी पोचखानबाला यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २०.६० लाख रुपये दान करण्यात आले. येत्या काळात असे सामाजिक उपक्रम करण्यासाठी भागीदारी वचनबद्ध असल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!