ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निवडणुका झाल्या आता देशातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या


गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या निवडणुकांचा धूम धडाका निकालानंतर संपलेला आहे त्यामुळे आता सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले लोक असो त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे लोकांचे प्रश्न म्हणजे धर्म असता राम मंदिर मज्जिद चर्च हे लोकांचे प्रश्न होऊ शकत नाहीत तर लोकांची मूलभूत प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी देशाची सुरक्षा महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला भयंकर वाद हे सर्व प्रश्न आता सुटायला हवेत आणि त्या सुटू शकतात जर इथल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार हे प्रश्न सोडवणे फारसे अवघड नाही मात्र हे प्रश्न सरकारच्या मूळअजेंड्यावर असायला हवेत आणि हे प्रश्न सोडवताना जात धर्म राम रहीम वगैरे वगैरे ज्या धार्मिक बाबी आहेत त्यांना बाजूला ठेवायला हवे कारण राम मंदिर मशिद धर्म आस्था ध्यान धारणा हे लोकांच्या पोटापाण्याची प्रश्न ठरू शकत नाही त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये जे समजदार नागरिक आहेत त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केवळ विकासाचे नारे दिले ज्याप्रमाणे पूर्वी काँग्रेस कडून गरिबी हटाव चे नारे दिले जात होते पण त्यांच्या सत्ता काळात गरीबी काही हटलेली नाही त्याचप्रमाणे देशाच्या विकासाच्या नाऱ्यांनी देशाचा अजूनही पूर्ण विकास झालेला नाही देशाचा विकास व्हावा असे जर सरकारला प्रामाणिकपणे वाटत असेल तर विकासाच्या प्रक्रियेत देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला सामावून घ्यायला हवे त्याचा विकास करताना त्याच्याकडे धर्माच्या चष्म्यातून बघताने कारण लोकशाहीने प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगार यांचा हक्क दिलेला आहे त्यामुळे या हक्कापासून कुठल्याही एका समाजाला सरकार वंचित ठेवू शकत नाही सध्या देशात स्थिर सरकार ची आवश्यकता आहे पण त्याचबरोबर स्थिर सरकार केवळ मोदीच देऊ शकतात ही भ्रामक कल्पना लोकांनी डोक्यातून काढायला हवी मोदींपेक्षाही चांगले लोक राजकारणात आहेत आणि ते सुद्धा देशाला चांगले सरकार देऊ शकतात आणि त्या सरकारच्या माध्यमातून या देशाचा आणि देशातील जनतेचा विकास करू शकतात म्हणूनच कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने लोकांनी उभे राहता नाही या देशात जे जे राजकीय पक्ष आहेत ते सगळेच आपले आहेत आणि हे सगळे राजकीय पक्ष देशाच्या उन्नतीसाठी जर काम करत असतील तर त्यांना वाईट कसे म्हणणार राजकारणात कोण कोणाला वाईट म्हणतो किंवा कोण कोणाला चांगलं म्हणतो याचा जनतेशी काडीचाही संबंध नाही लोकांची फक्त इतकीच अपेक्षा आहे की जे सरकार सत्तेवर येईल त्याने पाच वर्ष स्थिर राहायला हवे त्याचबरोबर अशा सरकारच्या माध्यमातून फोडाफोडीचे राजकारण आणि घोडेबाजार होता नये. जनतेचे हित हीच सरकारची प्राथमिकता असायला हवी मग ते एनडीएचे सरकार असो की इंडिया आघाडीचे सरकार असो जे कुणी सरकार सत्तेवर येईल त्यांनी देशातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊ सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचे धोरण राबवायला हवे

मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या काळात काही चांगले निर्णय झाले हे कोणीही नाकारत नाही पण त्याचबरोबर लोकांच्या मूलभूत प्रश्न पेक्षा धर्म आणि असता यांना मोदी ने जे प्राधान्य दिले ते देशवासियाला अजिबात मंजूर नाही आणि या निवडणुकीत लोकांनी त्यांना याच गोष्टीची आठवण करून दिलेली आहे भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात कोण कोणाच्या धर्मामध्ये इंटरफेअर करत नाही किंवा भारतात कुठलाही धर्म असुरक्षित आहे असं कोणीही म्हणू नये सगळे धर्म सुरक्षित आहेत त्या त्या धर्माचे लोक आपला काम धंदा करून आपल्या कुटुंबाचा आणि पर्यायाने देशाच्या विकासात मुलाचे योगदान देत आहेत आणि हे करत असताना आपल्या कर्तव्याला अधिक महत्त्व देत आहेत दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून जापान आणि जर्मनीची अक्षरशः राख रांगोळी झाली होती परंतु हे दोन्ही देश फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊन उठले आणि आज ते जगात महासत्ता बनवून भक्कमपणे उभे आहेत याचे कारण तिथल्या लोकांनी कामाला अधिक महत्त्व दिले काम केल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही ही बाब त्यांनी आपल्या मनावर बिंबवली आणि हे करत असताना ते कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माच्या आहेत त्यांचा देव कुठला आणि दानव कुठला याकडे त्यांनी कदापी लक्ष दिलेले नाही आणि म्हणूनच त्यांचा विकास झाला विकासाच्या प्रक्रियेत धर्म आणि असता ही मोठी अडचण आहे हे इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाने समजून घेणे गरजेचे आहे तेव्हा देशाचा विकास करताना जात धर्म पंथ भाषा या सगळ्या गोष्टी काही काळ बाजूला ठेवल्या तरच देश आर्थिक महासत्ता बनवू शकतो नवस करून किंवा मंदिरे बांधून देश आर्थिक महासत्ता बनणार नाही ही बाब या देशातील सगळ्याचा राजकीय पक्षांनी लक्षात ठेवायला हवी लोकांची धर्माबाबत निश्चितपणे असतात आणि प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या धर्मानुसार आचरण करीत असतो राम हिंदूंच्या हृदयात आहे घरातल्या देवाऱ्यात आहे मंदिरात आहे आणि सकाळी उठून घराबाहेर पडणारा प्रत्येक माणूस रामाची पूजा केल्याशिवायत रामाचे नामस्मरण केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही आणि हीच वस्तूस्थिती काही लोक लक्षात घेत नाहीत राम जर माणसाच्या हृदयात असेल तर त्याच्यासाठी रस्त्यावर का उतरावे हा खरा प्रश्न आहे प्रभू रामचंद्राने पित्याच्या एका वचनासाठी तेरा वर्षाचा वनवास भोगला आई-वडिलांच्या प्रति असलेले मुलांचे कर्तव्य प्रभू रामचंद्रांच्या या कृतीतून समाजासमोर आज आदर्श ठरलेले आहे माणसाचे त्याच्या कुटुंबा बाबत चेक कर्तव्य समाजाबाबतचे कर्तव्य आणि देशाबाबतचे कर्तव्य ज्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी त्यांना प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थाने कळले असे म्हणावे लागेल आणि म्हणूनच जे शासन करते आहेत त्यांनी राम राज्य आले पाहिजे असे नुसते म्हणून चालणार नाही तर रामाचे समाजाबाबत कुटुंबाबाबत आणि धर्माबाबत जी कर्तव्य भावना होती ती समजून घेणे आवश्यक आहे म्हणूनच या देशात आता ज्यांचे कुणाचे सरकार येईल मग ते मोदींच्या असो किंवा इंडिया आघाडीचे असो त्यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नाला प्राधान्य द्यायलाच हवे तरच त्यांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार राहील

error: Content is protected !!