ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत विजयी तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई विजयी

मुंबई, दि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१-मुंबई दक्षिण  लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत  विजयी झाले आहेत.
त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांना ३,९५,६५५ एवढी मते मिळाली तर यामिनी जाधव यांना ३,४२,९८२ एवढी मते मिळाली. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी  रवि कटकधोंड यांनी विजयी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

    मुंबई :लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत.
त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला. अनिल देसाई यांना ३,९५,१३८ एवढी मते मिळाली तर राहुल शेवाळे यांना ३,४१,७५४ एवढी मते मिळाली. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी विजयी उमेदवार अनिल देसाई यांना प्रमाणपत्र प्रदान केले.


error: Content is protected !!