ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अरविंद केजरीवाल पुन्हा तुरुंगात


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने अटक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. २१ दिवसांच्या अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा जामीनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, मुदत वाढवून मिळण्याच्या जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तसंच त्यांच्यावतीने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याची याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे.त्यामुळे आज त्यांना आत्मसमर्पण करावे लागले आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांनी आपल्या सहकार्यांसह राजघाटावर जावून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर सहकार्यांना मार्गदर्शन केले

error: Content is protected !!