ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री विठ्ठल रखमाई मंदिराचा जीर्णोद्धार

मु. पो.- टाकवे , तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ह भ प वैकुंठवासी तुकाराम कृष्णा रावते महाराज (भाऊ ) यांनी 1975 साली मंदिर बांधले होते. ते साधे व छोटे होते शिवाय, त्याला 46 वर्ष होऊन गेल्याने ,भाऊ यांच्या पुतण्यानी एकत्र येऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ..
       या सोहळ्याला चार वेद अभ्यासक गुरुजी उपस्थित होते .अखंड ब्रह्मचारी वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार ह भ प दिलीप कापूरकर – कासेगाव यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा व कळशा रोहनाचा कार्यक्रम पार पडला .
   अनेक मान्यवर मुंबई, पुणे,सांगली येथून कार्यक्रमास हजेरी लावली . गावच्या पंचक्रोशीतून असंख्य वारकरी उपस्थित होते .कीर्तनकार ह भ प शिवाजी पाटील , कीर्तनकार ह भ प पांडुरंग पाटील -वेळापूर, कीर्तनकार ह भ प अनंत सकपाळ ,ह भ प सखाराम चव्हाण , ह भ प संदीप चव्हाण ,शिवाजी बोबडे,ह .भ प. गणेश येळवे , टाकवे सरपंच रावते, पोलीस पाटील सुतार , सूर्यकांत जाधव, बाळकृष्ण जाधव, चे. संजय ठोबरे, बाळकृष्ण -रंगराव
ठोबरे, मोहन रावते,वसंत रावते ,पांडुरंग साळुखे , संदीप कुंभार ( फॊजी ) ,पांडुरग शेवाळे , नामदेव रावते , सुनील राऊत , विश्वनाथ रावते ,अनंत खोचरे आदी ग्रामस्थ, टाकवे येथील भजनी मंडळ ,भैरवाडी येथील भजन मंडळ वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते .
        मंगळवार दिनांक 10 .8 2021 रोजी सायंकाळी भव्य श्री विठ्ठल रुक्माई मंदिराची भव्य मिरवणूक काढण्यात आली . दिनांक 10 .8 . 2021 व 11 .8 .20 21 रोजी होम हवन शास्त्रीय पद्धतीने विधी होऊन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना झाली . त्यानंतर शिखरावर कळस चढवण्यात आला.महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली

error: Content is protected !!