ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

घाटकोपर मध्ये होर्डींग कोसळून ८ ठार ६४ जखमी – परमिशन देणारे पालिका अधिकारी लटकणार


दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई/आज मुंबई पडलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपरमध्ये एक होर्डिंग कोसळून त्याखाली शंभर लोक दबले गेले. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला तर 64 जखमी आहेत त्याच्यावर राजावाडी आणि इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या बेकायदेशीर होल्डिंगला परवानगी देणारे पालिका अधिकारी या प्रकरणात चांगलेच लटकणार आहेत
घाटकोपर मधील रमाबाई नगर जवळ एक पेट्रोल पंप आहे .या पेट्रोल पंपालगतच 80 बाय 80 चे एक मोठे होर्डिंग होते आज मुंबईत झालेल्या वादळी पावसात हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी काही गाड्या उभ्या होत्या. तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने पावसापासून वाचण्यासाठी काही लोकही पेट्रोल पंप च्या आडोशाला उभे होते. आणि त्याच वेळेला होल्डिंग कोसळले आणि शंभरहून अधिक लोक दबले गेले या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस फायर ब्रिगेड, एन डी आर एफ च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. व त्यांनी 69 लोकांना त्या होर्डिंग खळूनबहेर काढले त्यात काही गंभीर तर काही किरकोळ जखमी आहेत दरम्यान या सर्वांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले पण त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतली व त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली तसेच जखमींना सरकारकडून मोफत खर्च दिला जाईल असे जाहीर केले त्याचबरोबर मुंबईतील सगळ्या होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले असून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत हे होल्डिंग इगो इंडिया या जाहिरात कंपनीचे असून या जाहिरात कंपनीविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याने या बेकायदेशीर होल्डिंगला कुठल्या पालिका अधिकाऱ्याने परवानगी दिली होती त्याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे या प्रकरणात आता पालिका अधिकरी चांगलेच अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे

error: Content is protected !!