ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदींच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर ! अमित शहा पुन्हा गृहमंत्री


नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून, राजनाथ सिंग, अमित शहा ,निर्मला सीतारामन, जयशंकर, या मंत्र्यांकडे त्यांची पूर्वीची खाते ठेवण्यात आली आहेत .त्यानुसार राजनाथ सिंग संरक्षण, अमित शाह गृह, जय शंकर परराष्ट्र, निर्मला सीतारामन अर्थ यांची खाती कायम असून भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते परिवहन हे खाते देण्यात आले आहे
आज सायंकाळी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये धर्मेंद्र प्रधान याना शिक्षण, ज्योतिरादित्य सिंधिया याना माहिती व प्रसारण, मनोहरलाल खट्टर यांच्याकडे ऊर्जा व नगर विकास, रामनाथ ठाकूर किसान कल्याण, अर्जुन राम मेघवाल कायदा व न्याय विभाग, अश्विनी वैष्णव रेल्वे, हार दीप पुरी पेट्रोलियम, तर महाराष्ट्रातील पियूष गोयल व्यापार व वाणिज्य, मुरलीधर मोहोळ नागरी उड्डायन राज्यमंत्री, रक्षा खडसे क्रीडा व युवा कल्याण राज्य मंत्री, रामदास आठवले सामाजिक न्याय, प्रतापराव जाधव आयुष राज्यमंत्री, तर मित्र पक्षांमध्ये जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांना अवजड उद्योग ,जितन राम माझी यांना लघु व सूक्ष्म उद्योग, हे दोन्ही नेते अनुक्रमे कर्नाटक व बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच लल्लनसिंग यांना पंचायत राज, तेलगू देशमचे राम नायडू यांना नागरी उड्डाण मंत्री बनवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ७२ मंत्री असून त्यातील ६१ भाजपचे तर ११ मित्र पक्षांचे मंत्री आहेत

error: Content is protected !!