ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बिलावरून झाला वाद !बार मालकाच्याडोक्यावर फोडल्या ३० बियरच्या बाटल्या

चंद्रपूर: जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटनाउघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे
विरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बिलावरून झालेल्या वादानंतर 3 आरोपींनी बारमालकाच्या डोक्यावर अतिशय अमानुषपणे बिअर-दारूच्या तब्बल 30 बाटल्या फोडल्या.
बार मालक नारायण मंथापूरवार आणि व्यंकटेश मंथापूरवार हे मारहाणीत जखमी झाले आहेत. व्यंकटेश मंथापूरवार यांच्यावर चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोरांपैकी रोहित तोकलवार हा एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तर राजेश आणि भीमराव असे 2 सख्खे आरोपी भाऊ अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस या आरोपींचा कसोशीने शोध घेताहेत

error: Content is protected !!