ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भोईवाड्याच्या एसआरएतील रहिवाश्यांचा बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा


मुंबई – परळ- भोईवाडा येथील एसआरएच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आज आपल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सायन येथीलओमकार बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने रहिवाशी सामील झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
परळ- भोईवाडा येथील जेरबाई वाडिया मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत २२ मजल्याच्या ६ इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र मागील काही काही दिवसांपासून या इमारतीमधील लिफ्टचा प्रश्न गंभीर बनला होता.काही इमारतींमध्ये ४ पैकी दोन किंवा कधी कधी एकच लिफ्ट चालू असायची त्यामुळे वृद्ध, आजारी, शाळकरी मुले यांची मोठी गैरसोय होत असे त्यातच बिल्डरकडून वीज आणि पाण्याची देयके थकल्याने वीज, पाणी पुरवठा खंडीत होण्याचा धोका होता. या सर्व समस्या तात्काळ सोडवण्याच्या मागणीसाठी आज रहिवाशांनी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला त्यानंतर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने ओमकार रियालीटीचे व्यवस्थापक बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुढील दीड महिन्यात रहिवाषांच्या सर्व समस्या सोडवण्याचे बॅनर्जी यांनी आश्वासन दिले . तसेच वीज , पाणी, लिफ्ट आदींची जी थकीत देयके आहेत ती लवकरच भरली जातील असे सांगितले. हा मोर्चा अत्यंत शांततेत पार पडला

error: Content is protected !!