ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण


भाईंदर :-सत्ताधारी आघाडीतील आमदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संजय बांगर, अब्दुल सत्तर यांच्या पाठोपाठ आता महिला आमदारही मागे राहिलेल्या नाहीत मंगळवारी भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली . या घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केलं आहे
आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.दरम्यान अश्याच एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
ही कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी नियामाचे पालन केले नसून केवळ विकासकाला फायदा पोहचवण्यासाठी हे बेकायदेशीर कृत केले असल्याचे आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होते.याबाबत माहिती घेण्यासाठी आमदार गीता जैन गेल्या होत्या.यावेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि सोनी यांना त्यांनी चांगलेच खडसावले. .परंतु त्याच वेळी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि त्यांच्या कानाखाली मारली

error: Content is protected !!