ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

हिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?

गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराज
मुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळे गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून हे निर्बंध मागे घेण्याची मागणी करीत आहेत आणि याच मागणीसाठी काल भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन हिंदूंच्या च सनांवर निर्बंध का असा सवाल केला.गणेश भक्तांच्या या नाराजीचा शिवसेनेला जबरदस्त फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे
मागील वर्षीपासून गणेशोत्सवावर कोरोंनाचे सावट असल्याने यावर्षीही सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले तसेच काही निर्बंध सुधा लादले ज्यात मूर्तीची उंची फक्त चार फूट असावी .कमानी लाऊ नयेत आरती व इतर कार्यक्रमात ध्वनी क्षेपक लाऊ नये तसेच आर्तीला गर्दी करू नये.विसर्जन मिरवणुका कडू नयेत विसर्जन स्थळी लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना नेऊ नये,शक्यतो धातूची किंवा संगांवरी मूर्तीच असावी आणि मुख्य म्हणजे कोरोंना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले सर्व नियम गणेशोत्सव मंडळांनी पाळावेत अशा प्रकारची नियमावली आहे याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वय समितीने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नियमावली मान्य केलीय पण बऱ्याच गणेशोत्सव मंडळाचा या नियमावलीला विरोध आहे खास करून गणेशोत्सवात जाहिरातीच्या कमानी लाऊ नयेत हा जो निर्बंध आहे तो अन्यायकारक असतो कारण उत्सव परिसरात लावल्या जाणाऱ्या जाहिराती हा मंडळाचा आर्थिक कणा असतो पण सरकारने त्यावरच आघात केलाय त्यामुळे गणेशोत्सव साजरा करायचा कसा असा सवाल गणेशोत्सव मंडळे करीत आहेत कारण एकीकडे लॉक डाऊन मध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्यात त्यामुळे लोकांकडून वर्गणी मिळणे कठीण अशावेळी जाहिरातीतून मिळणाऱ्या पैशातून गणेशोत्सवाचा खर्च होणार होता पण आता तोही मार्ग बंद झाल्याने काही उत्सव मांडले त्यांची एफ डी तोडून उत्सव साजरा करणार आहेत आणि म्हणूनच गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. तसेच गणेशोत्सव तोंडावर आला तरी कोकणात जाणाऱ्या गणेश्भाकता बाबत कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही.टी कधी करणार असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे

/ हिंदूंच्या च सणांवर निर्बंध का ?
लोकशाहीत नियम सगळ्यांसाठी सारखे असतात मग हिंदूंच्या च सणांवर निर्बंध का ? हे एक मोठ षडयंत्र आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला असून तसेच मुख्यमंत्री भेटत नसल्याने राज्यपालांना भेटावे लागतेय असेही ते म्हणाले आणि गणेशोत्सवावर लादलेले निर्बंध हटवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे

error: Content is protected !!