ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्यपाल गृह मंत्र्यांच्या भेटीला


मुंबई/ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला विधान परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या १२नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांनी तब्बल ९ महिने दाबून ठेवल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करताच राजभवनात खळबळ माजली असून या प्रकरणी काय करायचे याबाबतचा सल्ला घेण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटायला गेले आहेत आता अमित शहा यांच्या भेटीनंतर तर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
नामनिर्देश १२सदस्यांची यादी सरकारने ९ महिन्यापूर्वी राज्यपालांकडे पाठवली होती पण त्यावर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने लुथा नावाचे नासिक मधील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती त्यावर शुक्रवारी निकाल देताना राज्यपालांच्या या कृतीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न लवकर निकाली काढा असे म्हटले होते त्यामुळेच काल राज्यपाल अमित शहा यांना
भेटले.

error: Content is protected !!