ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

१६० कोटींच्या करचोरी प्रकरणी -आबू आझमींच्या ठिकाणांवर छापे

मुंबई – समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि विनायक ग्रुप चांगलाच अडचणीत आला आहे. काल आयकर विभागाने मुंबईपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी केली. अबू आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणासी आणि लखनऊ येथील ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आझमी यांची निनावी मालमत्ता शोधण्यासाठीच ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आझमी यांनी या छापेमारीबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ईडी आणि आयकर विभागाने काल चार राज्यांमध्ये मोठी छापेमारी केली आहे. त्यात अबू आझमी यांच्याशी काही ठिकाणांचाही समावेश आहे. आझमी यांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाने तीन शहरांमध्ये छापेमारी केली आहे. मुंबई, वाराणासी आणि लखनऊ ही तीन ठिकाणे असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अबू आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या देशबरातील एकूण 30 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले होते. बेनामी संपत्तीच्या खरेदी विक्री संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणासी, कानपूर आणि लखनऊमध्ये त्यावेळी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी आझमी यांच्यावर १६० कोटींच्या टॅक्स चोरीचा आरोपही करण्यात आला होता.
या ठिकाणांवरून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती लागली होती. त्याचा गेली १० महिने तपास सुरू होता. त्यानंतर काल मुंबई, वाराणासी आणि लखनऊमध्ये छापेमारी करणअयात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणासीतील विनायक ग्रुपच्या ठिकाणांवरही छापेमारी करणअयात आली आहे. हा विनायक ग्रुप समाजवादी पार्टीचे माजी महासचिव गणेश गुप्ता यांचा आहे. गणेश गुप्ता यांचं निधन झालं असून हा ग्रुप आता त्यांचे कुटुंबीय चालवत आहेत. या ग्रुपचे वाराणासीत आलिशना मॉल, गगनचुंबी निवासी इमारती आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सही आहेत.
दरम्यान, कालच्या धाडीत आयकर विभागाच्या हाती काय लागलं याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अचानक आयकर विभागाने एकाचवेळी तीन शहरात धाडी मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता आयकर विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!