ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग

राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहमत
मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग
मुंबई/भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ४० मिनिटांच्या भेटीत राज चे मन वळवण्यात चंद्रकांतदादा यांना यश आले भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याशी राज ठाकरे सहमत आहेत. पण परप्रांतीयांच्या मुद्द्या बाबत त्यांच्याकडून काही गोष्टींचा भाजपला खुलासा हवाय त्यावर थोडीफार अंडरस्टँडइंग झाली की मनसे आणि भाजपची युती होऊ शकते आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.चंद्रकांतदादा यांना पक्ष नेतृत्वाने दिल्लीला बोलावले आहे तिथे ते राज बरोबरच्या भेटीत झालेल्या चर्चेचं तपशील देतील तत्पूर्वी फडणवीस आशीष शेलार यांच्या सोबतही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे. भाजपला आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यााठी मनसे सारख्या मराठी माणसांवर प्रभाव असलेल्या पक्षाची गरज आहे त्यामुळेच हा नवा राजकीय सारीपाट मांडला जात असल्याची चर्चा आहे
.

error: Content is protected !!