ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

१७ ऑगस्टला शाळांची घंटी वाजणार


मुंबई/ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोंनाची पोजिविटी रेट आता कमी झालाय त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत म्हणूनच आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सक्रिय झाला असून पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यानंतर शाळा सुरू होतील मात्र १७ ऑगस्टला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते .सुरवातीला ८वी ते १२वी पर्यंतच्या वर्ग सुरू केले जातील आणि परिस्थिती पाहून पुढील वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल गेल्या वर्षी पासून कोरोंनाचा भीतीने शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले म्हणूनच आता कोरोंना नियंत्रणात असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय

error: Content is protected !!