ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना

विरार दि. 27: रा. स्व. संघ व जनकल्याण समिती वसईतर्फे चिपळूण व महाड आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामुग्री रवाना करण्यात आली. अतिवृष्टीमुळे चिपळूण व महाड येथील जनतेचे घरदार उध्वस्त झाले. आप्तस्वकीयांचा मृत्यू झाला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कोकणातल्या बांधवांना आपत्कालीन मदतीचे वसईत समाजमाध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास वसईतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

कमीत कमी वेळात वसईमधून औषधे, धान्य, कडधान्य, बिस्किटे, फरसाण, दूध पावडर, चहा पावडर, साखर, चादरी, टॉवेल , बेडशीट, साड्या, पँट, शर्ट व सतरंज्या इत्यादी जीवनावश्यक सामुग्री विरार, नालासोपारा व वसईमार्गे ठाणे येथे रवाना करण्यात आली. तेथून नवी मुंबईतील सामुग्री घेऊन महाड व चिपळूण येथे अपद्ग्रस्तांना मदत पोहोचवली जाणार असल्याचे निर्मल ठाकूर यांनी सांगितले.

error: Content is protected !!