ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

एकजुटीने निवडणूक लढवण्यास सज्ज व्हा – मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई/माणसाची फसगत एकदाच होते सारखी सारखी होत नाही. लोकसभा निवडणुकीला विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे आपली फसगत झाली. परंतु यावेळी मात्र महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही एकजुटीने निवडणूक लढवू या. आणि विधानसभेत विजयी होऊया. असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केले
शनिवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला .या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची भाषणे झाली. या सर्वांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणूक लढवण्याची आवाहन केले आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखायला हवा. मागच्या वेळेस सारखी गफलत व्हायला नको. विरोधकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवून निवडणूक जिंकली होती आम्हीही गाफील राहिलो होतो परंतु यावेळी मात्र आम्ही त्यांना तशी
संधी देणार नाहीअसे या मेळाव्यात शिंदे फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भाषण करताना काँग्रेस आणि नाना पटोलेंवर सडकून टीका केली. नाना पटोले म्हणतात पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत पण नाना डोक्यावर पडलेले आहेत .त्यांनी पंतप्रधानांवर असा आरोप करताना तारतम्य पाळायला हवे होते. असेही शिंदे म्हणाले तर अजित पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी परस्परांशी समन्वय साधून विधानसभा निवडणूकीत एकजुटीने काम करावे जेणेकरून महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात येईल. आणि विरोधकांची स्वप्न धुळीला मिळतील. असे महायुतीच्या नेत्यांनी या मेळाव्यात सांगितले. या मेळाव्याला प्रचंड अशी गर्दी झाली होती. शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित होते .त्याचबरोबर राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचे झाडून सगळे कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी या माहितीच्या मेळाव्याला उपस्थित होते.

error: Content is protected !!