वॉशिंग मशीन झिंदाबाद!रवींद्र वायकर याना क्लिनचीट
मुंबई/ जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचीट देण्यात आली जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ई ओ डब्ल्यू कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार असू नेहलानी , राज लाल चंदानी, प्रितपाल बिंद्रा, आणि आर्किटेक अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठी राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोबत यांनी केला होता. या गैरप्रकारातून पालिकेचा महसूल बुडाल्याचा आरोप करीत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .परंतु आता मात्र रवींद्र वायकर हे सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे त्याला जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यातील अगदी सहजपणे क्लिनचीट मिळाली आहे .त्यामुळे विरोधकांकडून वॉशिंग मशीन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत
