ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

फॉरेन फंडिंगला वेसण


केंद्राकडून 12 हजारहून अधिक एनजीओ चे परवाने रद्द
दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया, ऑक्सफेम इंडिया सह देशातील बारा हजाराहून अधिक अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे (एन जी ओ )फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेगुलेशन लायसन्स ( परकीय निधी स्वीकारण्याचे परवाने) केंद्र सरकारने रद्द केले आहेत .एक जानेवारीपासून या सर्व संस्था परदेशातून मिळणाऱ्या देणग्या स्वीकारु  शकणार नाहीत.
गृहमंत्रालयाकडून शनिवारी माहिती देण्यात आली. सहा हजाराहून अधिक एन जी ओ पैकी बहुतांशी परवाना नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केल नव्हता. या संस्थांना 31 डिसेंबर पूर्वी नूतनीकरणाचा अर्ज दाखल करण्याची सूचना देण्यात आल्या होत्या.
        इंडियन मेडिकल असोसिएशन, लेप्रसी मिशन, ट्यूबर क्लोसेस असोसिएशन ऑफ इंडिया, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट कल्चरल सेंटर , इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर और फंडिंग संस्थेवर आता बंदी असेल
     देशात आता 16 हजाराहून अधिक एन जि ओ कडे फॉरेन फंडिंग चा परवाना उरलेला आहे. ३१ डिसेंबर 2021 पासून 3१ मार्च 2022 साठी या संस्थांचे परवान्याचे नूतनीकरण झाले आहे.

error: Content is protected !!