ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक


नाशिक/गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक येथील ९४वया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटही मोठ्या वादनेच झाला .समारोपाच्या दिवशी परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेले लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे
गिरीश कुबेर हे परिसंवाद आटोपून बाहेर पडत असताना अचानक त्यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेरले आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर शाई फेकली .कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात संभाजी महाराज यांची बदनामी केली आहे असा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे म्हणून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली या घटनेचा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढोले पाटील,स्वागताध्यक्ष छगन भुजबळ तसेच आयोजकांनी तीव्र शब्दात निषेध केलाय

error: Content is protected !!