ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईच्या पाणी पट्टीत वाढ होणार


मुंबई – यंदा पावसाळा लांबला आहे. धरणातील पाणी साठे कमी होत आहेत . त्यामुळे एकीकडे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट असतानाच पालिका पानपट्टी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
सन २०२३-२४ मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव पाणी विभागाने पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पालिकेने सन २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने याबाबत प्रशासनाला अधिकार दिले आहेत. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी तसेच धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च या सर्वाची गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला जातो.

error: Content is protected !!