ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

उल्हासनगरातील व्यापाऱ्यानो जी एस टी भरु नका . पंतप्रधान मोदीच्या भावाचा व्यापाऱ्याना सल्ला .

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यानो जी एस टी सह कोणता ही कर भरु का तुमची एकजुट दाखवा मग बघा महाराष्ट्र सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दिला आहे . मोदी याना यु टी ए या व्यापारी संघटनेने उल्हासनगरात आणले होते .

उल्हासनगर येथिल व्यापाऱ्यांच्या हिताचे काम करणाऱ्या यु टी ए संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती . दिपक छितलानी व राम वाधवा यानी मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी याना व्यापाऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी उल्हासनगर येथे आणले होते . या वेळे सोमय्या हॉल मध्ये व्यापाऱ्याना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की महाराष्ट्र हे केंद्राला जी एस टी देणारे एकमेव मोठे राज्य आहे . जर येथिल व्यापाऱ्यानी एकजुट दाखवुन जी एस टीच काय अन्य कोणते ही कर भरु नका मग बघा राज्य सरकारच काय केंद्र सरकार ही तुमच्या पुढे झुकेल असा सल्ला प्रल्हाद मोदी यानी व्यापाऱ्याना मार्गदर्शन करताना दिला आहे ते पुढे म्हणाले की गुजरात च्या व्यापाऱ्यानी एकता दाखवली तेव्हा सरकार त्यांच्या पुढे झुकले आहे . त्याच प्रमाणे तुम्ही ही करा असा सल्ला देवुन ते पुढे म्हणाले की गुजरात मध्ये रासायनिक कंपन्या बंद केल्या आहेत . ज्या ही कंपन्या आहेत त्यानी आपले रासायनिक सांड पाणी शुध्द करण्याची यंत्रणा लावली आहे . त्यामुळे गुजरात मध्ये प्रदुषण कमी आहे . उल्हासनगर येथिल सोमय्या हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यापाऱ्यांच्या ४० संघटना सहभागी झाल्या होत्या . दरम्यान प्रल्हाद मोदी यानी उल्हासनगर येथिल नगरसेवकाना मात्र कान पिचक्या दिल्या आहे . ऐवढे नगरसेवक असताना सुध्दा उल्हासनगर शहरात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्या कडे कोणी लक्ष देत नाही असे ही ते म्हणाले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यु टी ए चे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती . दिपक छतलानी. राम वाधवा . दिनेश लहरानी यानी मेहनत घेतली .

error: Content is protected !!