ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार

पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार
बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ
मुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय इतिहासाची साक्षीदार असलेल्या बी डी डी चाळीचा पुनर्विकास होतोय पण त्यानंतर घर विकून इथला मराठी टक्का कमी करू नका असे कळकळीचे आव्हान शरद पवार यांनी पुनर्विका
साच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथल्या रहिवाशांना केले तर माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात येवढे मोठे काम होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज वरळी येथे एका भव्य कार्यक्रमात मुंबईतील परेल,नायगाव, वरळी येथील १९५ बी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला यावेळी शरद पवार हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की आजचा दिवस खास आहे. आजच्याच दिवशी लोकमान्य टिळकांना अटक झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गिरणगावात बंद पाळण्यात आला होता तसेच या भागात काही काळ वास्तव्यास राहून संयुक्त महाराष्ट्र आणि कामगार चळवळीत भाग घेतलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचीही आज जयंती आहे. या भागाचा इतिहास मोठा आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्र्बों. ठाकरे,आचार्य अत्रे,श्रीपाद डांगे,सुनील गावस्कर आदी मान्यवर या भागात राहून गेले. मराठी माणसाची आणि कामगारांची एक मोठी ताकत या बी डी डी चाळींमध्ये निर्माण झाली होती ती जपून ठेवा असेही ते म्हणाले.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की माझ्या मुख्यमंत्रीपदाचा कारकीर्दीत येवढे मोठे काम होईल असे स्व्पनात वाटले नव्हते. बी डी डी चाळीचा एक मोठा इतिहास आहेत. चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत या चाळींचा आणि इथल्या कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आपण कितीही मजले टावर बांधले तरी या चाळीच्या ऋणातून मुक्त होणार नाही .त्यामुळे ही संस्कृती आणि मराठीपण जपून ठेवा असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले . या कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री अजितदादा वी सी द्वारा हजार होते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे,सतेज पाटील,जितेंद्र आव्हाड हे मंत्री खासदार अरविंद सावंत,तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर हजार होते.


एक थप्पड मारली तर उठणार नाही– उद्धव ठाकरे

शिवसेना भवन पाडून टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रसाद लाड याला इशारा देताना मुख्यमंत्री म्हणाले थप्पड मारण्याची भाषा आमच्याजवळ नको आम्ही थप्पड देतच इथपर्यंत आलो. आम्ही दोन खाल्ल्या तर समोरच्याला दहा दिल्या आणि यापुढेही देऊ एक थप्पड दिली तर पुन्हा उठणार नाही अशी शिवसैनिकांची ताकत आहे असेही ते म्हणाले

error: Content is protected !!