ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार

दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे . त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे .
मागील पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी राज्यसभेत मोठा गोंधळ घातला होते कागद फाडून सभापती वर फेकले होते तसेच वेल मध्ये जमून घोषणा दिल्या होत्या . त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती मात्र समितीचा अहवाल सभापतींनी राखून ठेवला होता आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फुलादेवी नेताम,छाया वर्मा ,रिपून बोरा ,राजमणी पटेल, सय्यद नजीर हुसेन ,अखिलेश प्रसाद सिंग[सर्व कॉंग्रे] तसेच डोळा सेन , शांती शेत्री [तृणमूल कॉंग्रेस] अनिल देसाई ,प्रियांका चतुर्वेदी [शिवसेना ] आणि एल्गरम करीम [मा का प ]यां १२ खासदारांना निलंबित केले . या घटनेचे विरोधकांमध्ये तीव्र पडसाद उमटले सर्व विरोधकांनी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले . तसेच राज्य सभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधकांची एक बैठक झाली . त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खर्गे यांनी सांगितले कि सत्ताधार्यांचे घोटाळे बाहेर निघतील म्हणून सरकार विरोधकांचा आवाज स्दाब्ण्याचा प्रयत्न करीत आहे . पण आम्ही गप्प बसणार नाही . आणि माफी मागण्याचा प्रश्नच नाही . त्या खासदारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही मग माफी कसली मात्र सरकारची हीच भूमिका राहिली त रामही अधिवेशनावर बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी दिला आहे . त्यामुळे हा विषय आता सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान काल विरोधकांनी संसदेचा दोन्ही सभागृहातून सभात्याग केला १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार दिला

दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे . त्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठी कोंडी नुइमन होण्याची शक्यता आहे .
मागील पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी राज्यसभेत मोठा गोंधळ घातला होते कागद फाडून सभापैंवर फेकले होते तसेच वेल मध्ये जमून घोषणा दिल्या होत्या . त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती मात्र य समितीचा अहवाल सभापतींनी राखून ठेवला होता आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फुलादेवी नेताम,छाया वर्मा ,रिपून बोरा ,राजमणी पटेल, सय्यद नजीर हुसेन ,अखिलेश प्रसाद सिंग[सर्व कॉंग्रे] तसेच डोळा सेन , शांती शेत्री [तृणमूल कॉंग्रेस] अनिल देसाई ,प्रियांका चतुर्वेदी [शिवसेना ] आणि एल्गरम करीम [मा का प ]यां १२ खासदारांना निलंबित केले . या घटनेचे विरोधकांमध्ये तीव्र पडसाद उमटले सर्व विरोधकांनी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले . तसेच राज्य सभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधकांची एक बैठक झाली . त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खर्गे यांनी सांगितले कि सत्ताधार्यांचे घोटाळे बाहेर निघतील म्हणून सरकार विरोधकांचा आवाज स्दाब्ण्याचा प्रयत्न करीत आहे . पण आम्ही गप्प बसणार नाही . आणि माफी मागण्याचा प्रश्नच नाही . त्या खासदारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही मग माफी कसली मात्र सरकारची हीच भूमिका राहिली त रामही अधिवेशनावर बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी दिला आहे . त्यामुळे हा विषय आता सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान काल विरोधकांनी संसदेचा दोन्ही सभागृहातून सभात्याग केला

error: Content is protected !!