ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

डॉ. मनोहर जोशी यांचे 85 व्या वर्षात पदार्पण- माध्यमांशी साधणार सुसंवाद

;मुंबई, दि. (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी हे गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे एकमेकांना भेटणे शक्य नव्हते. आता वातावरण थोडेफार निवळत आहे. डॉ. मनोहर जोशी यांनी आपल्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसार माध्यमातील बंधुभगिनींशी सुसंवाद साधण्याची इच्छा दर्शविली असून ते दादर (पश्चिम) येथील कोहिनूर मधील आपल्या कार्यालयात गुरुवार, २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या दरम्यान हा सुसंवाद साधतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!