ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुढाऱ्यांना गाव बंदी घालाराज्यभर- साखळी आंदोलन करा-

ज्यांना शक्य आहे ते त्यांनी आज पासून आमरण उपोषण करावे इतरांनी पाणी पिऊन आंदोलन करावे असं आव्हान जरांगे यांनी केले. या उपोषण दरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य शासनाचे असेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण अधिक तापण्याचे चिन्ह आहे.
मराठा आंदोलन याची धार आणखी वाढली असून जालन्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जालना छत्रपती संभाजीनगर मार्गावर मराठा आंदोलकानी चक्का जाम आंदोलन केले. आरक्षणाची मागणी करत आंदोलकांनी घोषणा बाजी केली. त्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुसरीकडे रोहिलागड गावात 40 जणांनी मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन केले मराठा आरक्षणाचा जीआर काढून मनोज जरांगे यांचे आंदोलन थांबवावे अशी मागणी आंदोलकानी केली.


error: Content is protected !!