ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप

आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते वानखेडे यांची क्रुझ वरील रेड ही बोगस होती तसेच ते मुस्लिम आहेत त्यांचा पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता त्यांची आई वडील आणि पहिली पत्नी मुस्लिम होती त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट सुधा बनावट होते असा आरोप करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.शिवाय त्यांचे वडील आणि बहिनिवरही आरोप केले होते .आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कांबळे नावाच्या एका दलीत इसमाचा हवाला देत वानखेडे यांनी मागास वर्गीय तरुणाची नोकरी हिसकावून घेतली होती.त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकणारच असे म्हटले होते या प्रकरणी समीर वानखेडे यांनी मागास वर्गीय आयोगाकडे रीतसर फिर्याद करून आपण दलीत असल्यामुळेच मलिक आपल्याला व आपल्या कुटुंबाला त्रास देत आहेत असा आरोप केला होता .त्याची दखल घेऊन मागासवर्गीय आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्राचे गृह सचिव,पोलीस महासंचालक,आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस बजावून या प्रकरणी खुलासा करायला सांगितले आहे .त्यामुळे मलिक यांच्यावर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे परिणामी मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत .
दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या या नोटिशिला आता काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबईच्या माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात एक तक्रार दखल झाली असून त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे दाखल झालेली ही पाचवी तक्रार आहे .

वानखेडे प्रकरणाला नाट्यमय वळण गृह सचिवाणी मागास वर्ग आयोगाची नोटीस-नवाब मलिक अडचणीत
मुंबई/ आर्यन खान प्रकरणात एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिल्याप्रकरणी वानखेडे यांच्या तक्रारीवरून मागास वर्ग आयोगाने राज्याचे गृह सचिव,पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना नोटीस देऊन याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे

error: Content is protected !!