ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिंदे गटाची पहिली यादी जाहीर सात माजी खासदारांना पुन्हा उमेदवारी


मुंबई/महायुतीतील शिंदे गटाची आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे या यादीमध्ये सात विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेले आहे तर नाशिक ठाणे संभाजीनगर कल्याण डोंबिवली या मतदार संघांमधील उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाही
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हिंगोलीतून महेश पाटील कोल्हापूर मधून सदाशिव मंडलिक आज कंगले मधून धैर्यशील माने मावळ मधून श्रीरंग बारणे शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे तर रामटेक मध्ये काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलेले आहे शिंदे गटात त नाशिक कल्याण डोंबिवली ठाणे अशा पाच मतदारसंघाबाबत बदबेदायेत. विशेष म्हणजे शिंदे यांचे सुपुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबवली लोकसभा मतदारसंघाबाबत ही अजून निर्णय झालेला नाही या ठिकाणी भाजपा इच्छुक होते परंतु नंतर भाजपाने माघार घेतली पण तरीही अजून कल्याण मतदार संघात कोण याचा निर्णय लागलेला नाही तोच प्रकार नाशिकमध्ये आहे नाशिक मधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे इच्छुक आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची अनेक वेळा भेटही घेतली परंतु तिथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटात नाराजी असून या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!