ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाकरे गटाची यादी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे

१६ जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे.
उरलेल्या ५ जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. पालघर, कल्याण, उत्तर मुंबई यासारख्या जागांचा त्यात समावेश आहे. तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी पाठिंबा मागतायत. सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे त्याबाबत लवकरच निर्णय होईल.
काँग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार

जाहीर केला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटलं होतं. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
बुलढाणा/ नरेंद्र खेडकर
यवतमाळ वाशिम/संजय देशमुख
मावळ/ संजोग वाघेरे पाटील
सांगली/ चंद्रहार पाटील
हिंगोली/ नागेश आष्टीकर
औरंगाबाद/ चंद्रकांत खैरे
धाराशिव/ ओमराजे निंबाळकर
शिर्डी/ भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक/ रजाभवू वाजे
रायगड/ अनंत गीते
सिंधुदुर्ग रत्नागिरी/ विनायक राऊत
ठाणे/ राजन विचारे
दक्षिण मद्य मुंबई/ अनिल देसाई
ईशान्य मुंबई/ संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई/ अरविंद सावंत
वायव्य मुंबई/ अमोल कीर्तीकर
परभणी/ संजय जाधव

error: Content is protected !!