ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या नाहीत


सावरकरांच्या नातवाचा अजब दावा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी एक दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या पुण्यतिमुंबई – थी आहे. ३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. मात्र आता रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये नथुराम गोडसेच्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झालीच नाही असं म्हटलं आहे. हे पुस्तक रणजीत सावरकर यांनी लिहिलं आहे.
मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन झालं आहे. या पुस्तकात रणजीत सावरकर यांनी हा दावा केला आहे की महात्मा गांधी यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्याने महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. तसंच गांधींच्या हत्येमागे कोण आहेत हे शोधण्याचं आवाहनही रणजीत सावरकर यांनी केलं आहे. या पुस्तकामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलेली नव्हती असा मोठा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

error: Content is protected !!