ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बिहारच्या सत्तांतराचे महाराष्ट्र कनेक्शन


मुंबई – देशात पक्षांतर विरोधी कायदा कमजोर असल्याने खुर्चीसाठी या पक्षातून त्या पक्षात उद्यामार्नार्यांची संख्या वाढत चाली आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे घडले तेच बिहार मध्ये घडले.
महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील काहींनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार बनवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा असताना या दोन्ही पक्षातील दलबदलू आमदारांपैकी
एकही आमदार अपात्र ठरला नाही. त्यामुळे भविष्यात पक्षांतर करणे कदापि गुन्हा ठरणार नाही . पक्षांतर करून मतदारांना फसवणे गुन्हा ठरणार नाही. आणि जे महाराष्ट्रात घडले  जे बिहार मध्ये घडले तेच यापुढे इतर राज्यांमध्ये घडणार आहे . 
बिहारच्या  मुख्यमंत्रीपदी ९  व्या वेळेस नितीशकुमार यांनी शपथ घेतली. भाजपसोबत स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत. ज्यांनी मागील दीड वर्ष मेहनत करून जेडीयू-आरजेडी सरकारला सुरुंग लावत भाजप सोबत जेडीयूला घेत नवं सरकारं स्थापन करण्याची मोहीम फत्ते केली. राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे यांनी या सत्ताबदलात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे.
दीड  वर्षांपूर्वी बिहारमध्ये भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयू यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार राज्याची जबाबदारी मिळाली. ज्या पद्धतीने भाजपला सत्तेतून बाजूला करण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा भाजपला सत्तेत आणण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. 
बीहारमध्ये जातीय राजकारणात लालूप्रसाद यादव तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांना शह द्यायचा असेल तर पहिला जातीचा अभ्यास करावा लागेल हे लक्षात घेऊन विनोद तावडे यांनी एक मास्टर प्लॅन रचला आणि दीड वर्षानंतर सत्तेच्या रूपाने तो यशस्वीरित्या तळागाळात रुजल्याचं राजकीय जाणकारांच्या लक्षात आलं आहे.
बीहारमध्ये जमीनदार, ओबीसी आणि दलित राजकारण महत्त्वपूर्ण आहे. या राजकारणाला जर शह द्यायचा असेल तर त्यासाठी भाजपमध्ये देखील बदल करावे लागतील याची स्पष्ट सूचना केंद्रीय नेतृत्वाकडे विनोद तावडे यांनी केली. त्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने तातडीने विनोद तावडे यांच्या अपेक्षेनुसार राज्यातील महत्त्वाच्या पदांचे वाटप केले, जबाबदारी निश्चित केली.

error: Content is protected !!