ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

यंदाही मुलींनीच मारली बाजीदहावीचा निकाल ९५ .८१ टक्के

मुंबई-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. मार्च महिन्यात राज्यात दहावीची परीक्षा झाली. आता याचाच निकाल लागलाय. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्क्यात वाढ झालीये. हेच नाही तर नेहमीप्रमाणेच दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. मुलींच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालीये. राज्याचा निकाल यंदा ९५.८१ टक्के लागलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढलाय. २१ मे रोजी बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांच्या नजरा या दहावीच्या निकालाकडे होत्या.
सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय टक्केवारी आणि राज्याची एकून टक्केवारी ही जाहीर केली. यंदा कोकणच विभाग निकालात अव्वल ठरलाय. कोकण विभागासह पुणे विभागाचा निकाल देखील चांगला लागलाय.
यंदा सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय. नागपूर विभागाच्या निकालात मोठी घसरण बघायला मिळतंय. नऊ विभागापैंकी सर्वात खाली यंदा नागपूर विभाग आहे. सर्वात जास्त निकाल यंदा कोकण विभागाचा असून ९९. ०१ टक्के विभाग कोकण विभागाचा आहे. पुणे विभागाचा निकाल ९६. ४४ आहे. संभाजीनगर विभागाचा ९५. १५ टक्के आहे.
मुंबई विभागाचा ९५.८३ टक्के, कोल्हापूर विभागाचा ९७.४५ टक्के, अमरावती विभागाचा ९५.५८ टक्के, नाशिक विभागाचा ९५.२८ टक्के, लातूर विभागाचा ९५.२७ टक्के, नागपुर विभाग ९४.७३ टक्के याप्रमाणे दहावीचा निकाल लागलाय. या निकालात लातूर विभागाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारलीये. विशेष म्हणजे लातूरच्या १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळणार आहेत.
पहिल्यांदाच दहावीचा निकाल हा मे महिन्यात लागलाय. दरवर्षी दहावीचा निकाल हा जून महिन्यात लागतो. मात्र, पहिल्यांदाच असे झाले की, निकाल हा मे महिन्यात लागलाय. विद्यार्थी हे गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची वाट पाहत होते. शेवटी दहावीचा निकालआज जाहीर करण्यात आलाय. धमाकेदार कामगिरी विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात नक्कीच केलीये.

टाकवे विद्यालयाचा दहावीचा निकाल 100%

सांगली जिल्हा ,तालुका शिराळा मधील मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ मुंबई संचालित टाकवे हायस्कूल टाकवे विद्यालयाचा दहावीचा निकाल 100% लागला आहे.

error: Content is protected !!