ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

देशात २ दिवसात ७ नवजात बालकांसह ३५ जणांचा अग्निकांडात मृत्यू


देशात दोन दिवसांत आगीच्या तीन दुर्घटना घडल्या. यात लहान मुलांसह ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली. काही तासांनंतर, दिल्लीच्या हॉस्पिटलमधील चाइल्डकेअर युनिटमध्ये आग लागली आणि तिसरी घटना दिल्लीतील एका निवासी संकुलात घडली. दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये काही तासांच्या अंतराने या घटना घडल्या. पण या घटना नक्की कशामुळे घडल्या? आगीच्या घटना वाढण्याचे कारण काय? देशात अग्निसुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
राजकोटमधील टीआरपी नावाच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत नऊ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला. सुट्टीचा दिवस असल्याने या गेमिंग झोनमध्ये सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येते की, मनोरंजन आणि थीम पार्कच्या आवारात काम सुरू असताना ही आग लागली. थीम पार्कच्या आवारात वेल्डिंगचे काम सुरू असताना स्पार्क झाला. स्पार्क झाल्यानंतर जवळच्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला आग लागली. ही आग कामगारांना आटोक्यात आणणे अशक्य झाले. त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.आग पसरत असताना, प्रवेशद्वाराजवळच बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळली आणि अनेक लोक आतच अडकले. या अपघातामुळे सुविधेतील सुरक्षा मानकांबाबत चिंता निर्माण झाली आहे. बहुतेक सार्वजनिक इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमनासाठी दरवाजा असतो, पण इथे केवळ एकच दरवाजा होता. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, या गेमिंग झोनने राजकोट महानगरपालिकेकडून अग्निशमन मंजुरीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देखील घेतले नव्हते.
दिल्लीतील विवेक विहारमधील बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयात लागलेल्या आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. या रुग्णालयानेदेखील सुरक्षा नियमांचे पालन केले नाही. रुग्णालयाचा परवाना वैध नव्हता. “बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था नव्हती. अग्निशामक यंत्र बसवलेले नव्हते. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती,” असे पोलीस उपायुक्त (शाहादरा) सुरेंद्र चौधरी यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले.

error: Content is protected !!