ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

युक्रेनमध्ये अडकलेल्यांना आणण्यासाठी चार मंत्री रवाना


दिल्ली/ युक्रेन रशिया युद्धात आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम तेज करण्यात आली असून या मोहिमेच्या अंतर्गत केंद्रातील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील राष्ट्रात जाऊन या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.
रशिया युक्रेन युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र युक्रेन शरण येत नसल्याने तसेच या युद्धात रशियाचे सुधा मोठे नुकसान झालेले असल्याने रशियाने युक्रेंनवर अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युक्रेन आणि नाटो राष्ट्रात खळबळ माजली होती .याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी युपीचां प्रर्चार दौरा अर्धवट टाकून दिल्लीला धाव घेतली आणि एक हायलेवल मीटिंग आयोजित करून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय तेथून कसे आणायचे यावर दोन चार चर्चा केली . त्यानंतर युक्रेन मधून भारतीयांना परत आणण्यासाठी जी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू करण्यात आलीय त्या अंतर्गत चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रात पाठवले जाणार आहेत. यात ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप पुरी किरण रिजिजू,आणि व्ही के सिंग यांचा समावेश आहे हे मंत्री युक्रेनच्या शेजारील रुमनिया किंवा हंगेरी मधून युक्रेन मधील भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहीम राबवत त्यासाठी युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेन रोमानिया किंवा युक्रेन हंगेरी सीमेपर्यंत कसेही करून पोचावे लागणार आहे .दरम्यान युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी आणि त्यांचे भारतातील नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यासाठी @ ओ पी गंगा हे नवे ट्विटर हेंडल भारत सरकारने जारी केले.

error: Content is protected !!