ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शेवटच्या ओव्हर मध्ये इम्रान खान यांचा मध्यरात्री क्लीन बोल्ड- पाकिस्तानात सत्तांतर

इस्लामाबाद/ इम्रान खान यांची पाकिस्तानातील सत्ता उलथवून टाकण्यात अखेर तिथल्या विरोधी पक्षाला यश आले आहे.मात्र हा पॉलिटिकल ड्रामा इथेच थांबलेला नाही तर सत्ता गेल्यावर ज्या प्रमाणे नवाझ शरीफ यांना अटक झाली होती त्याच प्रमाणे इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे.
इम्रान खान यांच्या सत्ता काळात पाकिस्तानची वाट लागली होती देश कर्जबाजारी झाला होता सुडाचे राजकारण सुरू होते काळी जादू करण्यात एक्स्पर्ट असलेली इम्रान खानची पत्नी बुशरा बी हीचा राजकारणात हस्तक्षेप वाढला होता त्यामुळे पाकिस्तानात शहाबाज शरीफ,मौलाना फाझरुल रेहमान आणि बिलावल भुत्तो यांच्या तीन पक्षांच्या युतीने इम्रान खान यांच्या विरुद्ध आघाडी उघडली होती इम्रान खानच्या काही सहकारी पक्षांना आपल्या बाजूने ओढून घेतले होते त्यानंतर अल्पमतात आलेल्या इम्रान सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यावर 31 मार्चला चर्चा होणार होती पण इम्रान खान याने राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याचे आदेश दिले त्यामुळे संसद बरखास्त झाली पण सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींचे हे कृत्य बेकायदेशीर ठरवून अविश्वास ठराव मतदान घेण्याचे आदेश दिले त्यामुळे शनिवार पासून सतंतर नाट्याला सुरुवात झाली मात्र इम्रान खान अल्पमतात असल्याने मतदान टाळण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यात त्याला यश आले नाही अखेर मध्यरात्री त्याच्या पक्षाच्या सदस्यांनी संसदेतील वॉकआऊट केले आणि त्यानंतर अविश्वास प्रतावर मतदान झाले आणि हा प्रस्ताव १७४ विरुद्ध शून्य असा मंजूर झाला आणि सरकार कोसळले आता आज संसदेत नाव नेता निवडला जाईल आणि विरोधी पक्षाचे सरकार येईल आणि शहाबाज शरीफ हे पंतप्रधान बनतील

error: Content is protected !!