ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मराठा आरक्षणाबाबत बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक

पुणे- यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी११. ३० वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही दुसरी बैठक असेल.
मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच आयोगाच्या कामकाजासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि कामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच ओबीसी संघटनांच्या मागण्याच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त पत्रावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या या आधीच्या बैठका राजीनामा आणि नाराजीसत्रामुळे गाजल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला जेष्ठ सदस्य आणि माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम अनुपस्थित राहणार आहेत. न्या. मेश्राम हे आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने बैठकीला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे

error: Content is protected !!