ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कोरोंना केंद्रातील ऑक्सिजन प्लांट साठी २०० कोटींचे कंत्राट दंडात्मक कारवाई झालेल्या कंत्राटदाराला च आर्थिक सेटिंग करून कंत्राट

मुंबई/ पालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येतेय तसतसे पालिकेतील सत्ताधारी प्रशासनाला हाताशी धरून फावडा घेऊन उभे आहेत आणि निवडणुकी पर्यंत जेवढा खेचता येईल तेवढा माल खेचत आहेत.त्यामुळे गंभीर आरोप असलेल्या किंवा काळया यादीतील कंत्राटदार सुधा पालिकेचे लाभार्थी बनले आहेत. सध्या korona जनतेसाठी जरी चिंतेचा विषय बनलेला असला तरी झोलर लोकांसाठी पैसा कमावण्याचे माध्यम बनला आहे.पालिकेतील भ्रष्टाचारी लोकांसाठी तर ही एक मोठी पर्वणीच आहे म्हणून तर पालिका रुग्णालयांमध्ये वेळेवर ऑक्सिजन प्लांट उभारण्यास उशीर केलेल्या आणि त्याबद्दल ज्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती त्याच कंपनीला १३ कोरोंना केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे २०० कोटींचे कंत्राट दिले जाणार आहे.आणि हे सगळ कोणाचे खिसे गरम करण्यासाठी केले जात आहे असा संतप्त सवाल मुंबईकर जनता करीत आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन पालिकेने के ई एम,सायन,नायर या प्रमुख रुग्णालयास उपनगरातील काही रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले आहे.मात्र हे काम कार्यादेश दिल्यापासून३० दिवसात अपेक्षित होते मात्र त्या कालावधीत ते पूर्ण न झाल्याने पालिकेने काम पूर्ण होईपर्यंतच्या अतिरिक्त कलावधिकरता करणार मुळ्याच्या १० टक्के रक्कम आकारली जाणार आहे असा हा प्रस्ताव आहे असे असताना पुन्हा त्याच कंपनीला तीन गटामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे २०० कोटींचे कंत्राट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हे ऑक्सिजन प्लांट एन एन सी आय वरळी,पोदार रुग्णालय वरळी,कांदर पदा दहिसर,के जे सोमय्या मैदान सायन,बी के सी ,दहिसर चेक नाका नेस्को गोरेगाव आदी ठिकाणी आहे आणि या ऑक्सिजन प्लांट मध्ये प्रती मिनिट एक लाख तीन हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे कार्यादेश दिल्यापासून ४५दिवसात काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे तसेच चाचणी एक वर्ष हमी कालावधी आणि पुढील दोन वर्ष देखभालीची हमी देणे बंधनकारक असल्याची अट कंत्राटदाराला घालण्यात आली

error: Content is protected !!